वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

पाठी लागे तया दवडी द

🙏 3. संत तुकाराम · ABH-078242 · अभंग क्र. २४२६

2426.
पाठी लागे तया दवडी दुरी । घाली या बाहेरी संवसारा ॥१॥
येउनि दडे तुमच्या पायी । धावे तई छो म्हणा ॥धृपद॥
पारखियाचा वास पडे । खटबड उठी ते ॥२॥
तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊ कोणी ॥३॥

अर्थ :
देवा मी ज्याच्या पाठिमागे लागतो त्याचा पाठलाग दूर पर्यंत करतो व त्याला संसाराच्या बाहेर घालवीत असतो. देवा ज्या वेळी मला उपदेश रुपी कर्म नसते त्यावेळी मी तुमच्या पाया जवळ येऊन दडून बसतो आणि तुम्ही मला छो म्हटले की मी लगेच संसारिक लोकांचा उध्दार करण्याकरता धावत जाईन. परमार्थामध्ये खरी पारख असणारे संत मुनी जण यांचा मला वास लागला की मी लगेच खडबडून उठत असतो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या धन्याने मला असा धाक लावला आहे की मी मृत्युलोकातील जड जीव अज्ञानी लोकांना संसार रुपी ताक खाऊ देऊ नये आणि मी ते कोणाला खाऊ देणारच नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग