वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

सरे ऐसे ज्याचे दान ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078241 · अभंग क्र. २४४५

2445.
सरे ऐसे ज्याचे दान । त्याचे कोण उपकार ॥१॥
नको वाढू ऐसे काचे । दे वो साच विठ्ठला ॥धृपद॥
रडत मागे सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥

अर्थ :
दात्याने दान दिले व ते दान संपले तर त्या दात्याचे दान देऊन काय उपयोग होते. त्यामुळे हे विठ्ठले तु मला असे दान देऊ नकोस की जे कच्चे असेल तु खरे दान मला दे जे अविनाश असेल तेच दान तु मला द्यावे. मागे रडत येणाऱ्या मुलाचा त्याग करून पुढे जाणारी आई फार थोर असते काय? तुकाराम महाराज म्हणतात ज्या योगाने दान देणाऱ्या दात्याची कीर्ती वाढेल असेच दान दात्याने द्यावे हीच धर्म नीती आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग