वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तुज करिता होत ऐसे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078329 · अभंग क्र. २४५६

2456.
तुज करिता होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे ॥१॥
परि वर्म नेणे ते कोणी । पीडाखाणी भोगितील ॥धृपद॥
उल्लंघिते पागुळ गिरी । मुके करी अनुवाद ॥२॥
पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥
अवघे हेळामात्रे हरी । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥
तुका म्हणे खेळे लीळा । पाही वेगळा व्यापूनि ॥५॥

अर्थ :
देवा तुझी जर कृपादृष्टी झाली तर मूर्ख मनुष्य देखील चतुर होतात आणि वेडे मनुष्य देखील पंडित होतात. परंतु हे वर्मच कोणाला समजत नाही त्यामुळे ते दुःखाच्या खानीच भोगतील. देवा तुझी जर कृपादृष्टी झाली तर पागळा मनुष्य देखील पर्वत ओलांडून जाऊ शकेल आणि मुका मनुष्य देखील वेदाचा अनुवाद करू शकेल. पापी मनुष्य पुण्यवंत होतात आणि दुर्जन मनुष्य केव्हाही दुसऱ्याचा घात करत नाही. याप्रमाणे हरी सर्व ब्रह्मांडाला एका क्षणात मुक्त करू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात हरी हा विविध प्रकारच्या लीला करून खेळ खेळत असतो आणि सर्वत्र व्यापून देखील सर्वांपेक्षा वेगळा होऊन सर्व जगाचे व्यवहार पाहत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग