सोनियांचा देव सोनिया
2438.
सोनियांचा देव सोनियाचें देऊळ । सोनियांचा भक्त पूजी सोनियाच्या कमलें ॥१॥
नामची पै रूप ते अभिन्न । जगी जनार्दन तोचि पाहे ॥२॥
मृत्तिकेचा घट मृत्तिकेची वेळणी । मृत्तिकेचे आळें तेथे मृत्तिकेची माथणी ॥३॥
भिन्न भिन्नाकारीं मृत्तिका दिसते. साकार । एका जनार्दनी निज निर्विकार ॥४॥
