वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

आपणा आपण पाहे विचारु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086257 · अभंग क्र. २४५६

2456.
आपणा आपण पाहे विचारुनी विचारतां मनी देव तुंचीं ॥१॥
तूंचि देव असता फिरशी वनोवनीं । प्रगटली काहाणी बोलायासी ॥२॥
देहींचे देवळीं आत्माराम नांदे । भांबावला भक्त हिंडे सदा रानें ॥३॥
एका जनार्दने भ्रमाची गोष्टी । वायांचि शिणती होती कष्टी ॥४॥
२४५७ .
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी 2457
श्रमोनी वाउग्या बोलती चावटी । परी हातवटी नये कोणा ॥१॥
ब्रह्माज्ञानी ऐसे मिरविती वरी । क्रोध तो अंतरी वसतसे ॥२॥
सर्वरुप देखे समचि सारिखें । द्वैत अद्वैत पारखें टाकूनिया ॥३॥
एका जनार्दनी ब्रह्माज्ञान बोली । सहजचि आली मज अंगी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग