वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

नाही कंटाळलो परि वाट

🙏 3. संत तुकाराम · ABH-077934 · अभंग क्र. २४१५

2415.
नाही कंटाळलो परि वाटे भय । करावे ते काय न कळता ॥१॥
जन वन आम्हा समान चि झाले । कामक्रोध गेले पावटणी ॥धृपद॥
षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळे तुझ्या ॥२॥
म्हणऊनि मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावे ते ॥३॥
म्हणऊनि तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥४॥

अर्थ :
देवा मी तुझ्या सेवेला कंटाळलो नाही परंतु सेवा कशी करावी हे समजत नाही त्यामुळे भय वाटते. देवा जन आणि मन हे आम्हाला तर सारखेच झाले आहे आणि काम क्रोधाच्या तर आम्ही पायऱ्याच केल्या आहेत. हे अनंता आम्ही षड ऊर्मी रुपी शत्रुना जिंकले आहे केवळ तुझ्या नामाच्या सत्तेच्या बळावर. स्वामी जे सांगतील तेच शिरसावंद्य मानून त्याचे पालन करावे हाच आम्हा सेवकांचा मुख्य धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच मी देवा तुझ्या पाया कडे एक टक लक्ष देऊन आहे आणि तुझ्याकडून एक तरी आज्ञा वचन मला मिळेल याची वाट पाहत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग