पहाला तो दीन हरिखाचा
2416.
पहाला तो दीन हरिखाचा आम्हा । सर्वाभुतीं अभिन्न सदा देखो श्रीरामा ॥१॥
काय सांगु गोविंदा तुझी आवडी । जनी वनी नयनी नीत नवी गोडी ॥२॥
निमिष्य जैसे वर्ष तैसे आम्हा गोडी । हरिरुप पाहता हरिखे मनबुद्धि वेडी ॥३॥
जनवनमन अवघे जाले जनार्दन । एकाएकी पाहता तेथे हारपले मन ॥४॥
