निमाले राहिले गेले ऐ
2452.
निमाले राहिले गेले ऐसे म्हणती । वाया फजीत होती आपुल्या मुखें ॥१॥
नासलें कलेवर घेऊनिया मांडीं । वाउगे ते तोंडी बोलताती ॥२॥
स्वये आत्मज्योति जया नाही आदिअंत । तो आत्मा प्रत्यक्ष निमाला म्हणती ॥३॥
एका जनार्दनी उफराटी बोली । कैसी भ्रांती पडली त्यांचे मनी ॥४॥
