वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

तेरा दिवस जाले निश्च

🙏 3. संत तुकाराम · ABH-078054 · अभंग क्र. २४१०

2410.
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी झाले तुज ॥धृपद॥
तुजवरी आता प्राण मी त्यजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥४॥

अर्थ :
हे अनंता मायबापा आज मी तुझ्या भेटी करता तेरा दिवस झाले तसे उपोषणाला बसलो आहे तरीदेखील तु मला पावत नाहीस. हे ऋषिकेषा तु पाषाणाची खोळ अंगावर घेऊन बसलास काय तुला झाले तरी काय. हे पांडुरंगा तुझ्या साठी मी माझा प्राण त्याग करील आणि माझ्या हत्येचा दोष तुझ्यावर घालीन. हे विठाबाई मी तुझ्या भेटीची फार आशा धरली आहे आणि भेट जर झाली नाही ना पांडुरंगा तर मी माझ्या जीवाचा नाश करील. तुकाराम महाराज म्हणतात देवा आता तुझी भेट तरी घेईन किंवा माझा प्राण तरी सोडीन असा मी निर्णय घेतला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग