वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

स्मरण स्वयाती नलगे त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086363 · अभंग क्र. २४०९

2409.
स्मरण स्वयाती नलगे ती जपमाळ हाती । नाठवितां चित्ती स्मरण होय ॥१॥
तैसा देही देवो परिसुनीं भावो । नाठव तोचि आठवो होत असे ॥२॥
वस्तु वस्तुपणें जडोनि गेली अंगी । आठवू तो विसरु वेगी जाला वावो ॥३॥
अगाध डोहीं गगन बुडाले दिसे । परि न बुडतांचि असे गगनी गगन ॥४॥
तैसा देही देह असतांचि संचला । म्हणती हारपला लाज नाही ॥५॥
मृगजळाचि व्यक्ति जळपणाची प्रतीति । भासत असता स्थिति मिथ्या जैसी ॥६॥
एका जनार्दनी एकपणे निर्वाही । असतांचि देह वावो देहपणें ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग