वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

देह जाईल जाईल । यासी

🙏 3. संत तुकाराम · ABH-077897 · अभंग क्र. २४४७

2447.
देह जाईल जाईल । यासी काळबा खाईल ॥१॥
का रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥धृपद॥
लोडे बालिस्ते सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥
शरीरसंबंधाचे नाते । भोरड्या बुडविती सेताते ॥३॥
अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढे दगा ॥४॥

अर्थ :
अरे देह कधीतरी जाईल नक्कीच जाईल याला काळ खाईल. अरे दगडा तुला अजून कसे उमजत नाही समजत नाही कसले हत्ती घोडे आणि वाडा तु घेऊन बसला आहेस? अरे लोड गादया तक्के हे तुला तरुण पणात चांगले वाटतात परंतु पुढे वृद्धावस्‍था आली की तुझ्या फजितीला अंतपारच नाही राहणार. जसे भोरडे ( शेतात आलेली कंस खाणारे पक्षी) शेतमालकाला पूर्ण बुडवून टाकतात तसेच शरीरसंबंधाचे असणारे नाते सर्व आप्तेष्ट तु कमवलेला संपत्तीचा नाश करत असतात. तुकाराम महाराज म्हणतात अरे आता तरी तु जागा हो नाहीतर पुढे तुला फार मोठा काळाचा दगा पडेल.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग