साधन कांही नेणे मी अ
2414.
साधन कांही नेणे मी अबळा । शाम हे रूप बैसलेंसे डोळा ।
लोपली चंद्रसुर्याची कळा । तो माझा राम जीवांचा जिव्हाळा ॥१॥
राम हे माझे जीवींचे जीवन । पाहता मन हे माझे उन्मन ॥२॥
प्रकाश दाटला दाही दिशा । पुढेंही मार्ग न दिसे आकाशा ।
खुंटली गति श्वासोच्छ्वासा । तो राम माझा भेटेल हो कैसा ॥३॥
यासी साच हो परिसा कारण । एका जनार्दनी शरण ।
त्याची कृपा होय परिपूर्ण । तरीच साधें हे साधन ॥४॥
