वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

भांडावे ते गोड । पुर

🙏 3. संत तुकाराम · ABH-078034 · अभंग क्र. २४०९

2409.
भांडावे ते गोड । पुरे सकळ ही कोड ॥१॥
ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटा जवळा ॥धृपद॥
हाक देता दारी । येती जवळी सामोरी ॥२॥
तुका म्हणे शिवे । मागितले हाती द्यावे ॥३॥

अर्थ :
महादेवा आम्ही तुमच्याशी जसे जसे भांडावे तसे तसे आम्हाला तुमच्या विषयी गोडी अधिक वाढत आहे आणि आमचे सर्व लाड ही पूर्ण होत आहेत. ही तुमच्या घरची रीतच आहे मला हे कसे कळले असेल तर मी तुमच्या जवळ कायम राहतो म्हणून मला हे समजले. तुम्हाला दारातून हाक दिली की तुम्ही लगेच धावत समोर येऊन जवळ येता. तुकाराम महाराज म्हणतात हे महादेवा तुमचे नावच शिव आहे आणि मग तुम्हाला भक्त जे काही मागतील ते लगेच त्याच्या हाती तुम्ही देता.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग