लोक फार वाखा अमंगळ ज
2411.
लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥१॥
विषया वंचलो मीपणा मुकलो । शरण तुज आलो पांडुरंगा ॥धृपद॥
घर दार अवघी तजिली नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥२॥
तुका म्हणे पडिलो पुंडलिकापाशी । धाव हृषीकेशी आळिंगी मज ॥३॥
अर्थ :
हे पांडुरंगा काही लोक फार वाईट आणि अमंगळ आहेत आता मी त्यांचा त्याग केला आहे. मी विषयासंबंधी सावध होऊन मीपणाला मुकलो आहे आणि त्यामुळे मी आता तुला पांडुरंगा शरण आलो आहे. हे नारायणा मी तुझ्यासाठी सर्व घरादाराचा त्याग केला आहे कारण तु माझ्या जीवाचे जीवन आहेस पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात हे ऋषिकेषा मी पुंडलिका जवळ पडलो आहे तरी तु माझ्या कडे धाव घे आणि मला आलिंगन द्यावे.
