वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

पाहो गेलो देवालागीं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086316 · अभंग क्र. २४११

2411.
पाहो गेलो देवालागीं । देवरुप झालो अंगी ॥१॥
मीतुंपणा ठाव । उरला नाही अवघा देव ॥२॥
सुवर्णाचीं झाली लेणीं । देव झाला जगपणीं ॥३॥
घटी मृत्तिका वर्तत । जगी देव तैसा व्याप्त ॥४॥
एकानेक जनार्दन । एका जडला एकपणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग