सत्त्व रज तम गेले नि
2429.
सत्त्व रज तम गेले निरसोनी । दृश्याची लावणी कैशी झाली ॥१॥
गेलिआ माघारीं पाहता न दिसे । स्वतः तो प्रकाशे सदोदित ॥२॥
अंतर बाहेरीं पाहता शेजारी । प्रकाशतां अंतरी लखलख ॥३॥
एका जनार्दनी प्रकाश संपुर्ण । सर्व नारायण बिंबलासे ॥४॥
