वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

तंव पुस्ती होय माता

🙏 4. संत नामदेव · ABH-081722 · अभंग क्र. ९९०

990.
तंव पुस्ती होय माता | तुम्ही झणे खेद करा चित्ता |तरी ज्ञानासारिखा का आता |समाधीसी बैसविता ॥१॥
हे सांगावे सविस्तर | याचे कोण कोण अवतार | बंधु त्रिवर्ग हे साचार |आणि ते भगिनी ॥२॥
देव म्हणती ब्रह्मा ‌होय | सोपान देव नेणसी काय |निव्रुत्ति शिव ज्योतिर्मय |ज्ञानदेव ब्रह्म निघोंट ॥३॥
ऐसे ब्रह्मा विष्णु हर | मुक्ताई ते मूळमाता साचार | तारावया चराचर | कलिमाजी अवतरले ॥४॥
रुक्मिणी पुसे देवासी | का कलिमाजी जन दोषी | हे घातली देवा पुसी |ते सांगती महाविष्णु ॥५॥
तरी ऐके हो साचार चित्ते | तू काय नेणसी त्या व्यासाते | ग्रंथी सांगितले भारते |कलिमाजी जन दोषी ॥६॥
क्रुष्ण अवतार जाला | पांडवी निजठाव ठाकिला |तेथून एक शकु जाला |जनमेजयापासूनि ॥७॥
तया मागे विक्रमशक | पुण्य पवित्र सकळ लोक | कलियुगी पुण्यश्लोक |उज्जनिये नांदती ॥८॥
तेणे एक शतक पंचतीस | हरिले कळिकाळदोष | पुढे शालिवाहन होवयास | अवतार जाण पैठणी ॥९॥
तो हा शालिवाहन | अठरा हजार जाण |ते क्षेत्र प्रतिष्ठान | गंगातीरी प्रत्यक्ष॥१०॥
या शकामाजी प्रथम | राजा भोज उत्तम |मग पुण्यपुरुष जन्म | थोडे घेती कलियुगी ॥११॥
राजे भ्रष्ट यवन जाले |ठायी ठायी दोष घडले | मग इही अवतार घेतले | कलिदोष हरावया ॥१२॥
रुक्मिणी म्हणे स्वामी | सत्य सांगितले तुम्ही | पुराणप्रसिद्ध आम्ही | अवतार चरित्र जाणतसो ॥१३॥
नामा म्हणे पुढे हे जन | यवनसंसर्गे कठिण | होता गाता हरीचे गुण |ते उध्दरती सर्वथा ॥१४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग