वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

देवासी कळले गौप्यगुज

🙏 4. संत नामदेव · ABH-081707 · अभंग क्र. ९८३

983.
देवासी कळले गौप्यगुज | म्हणे रे नामया हेंचि चोज | तो निजभाव सहज | प्रगट सांगू आता ॥१॥
क्रुतयुगी क्षेत्र आदि | ज्ञानदेवा तेथे समाधि | देव सांगतसे शुद्धी | योगबुद्धी जुनाट ॥२॥
ऐके भक्तजनश्रेष्ठा | भूमिनामे वैकुंठपीठा |ते हे आळंकापुरी श्रेष्ठा | आदि वरिष्ठा पीठा आठरा ॥३॥
आणिक ऐकरे वचन | हे पंचक्रोशी पुरातन | यासी युगे सांगता संपन्न | चतुरानन जाणतसे ॥४॥
काहीएक किंचित सांगो | युगसंख्या मार्गात रिघो | तरी वैवस्वत हाचि मागो | पूर्ण वोळंगो यापासोनी ॥५॥
मनु सहस्त्र युगे संख्या | तै आळंकापुरी आदि लक्षा | कोटी याग असंख्या | सहस्त्र दक्ष येथे जाले ॥६॥
आदि क्षेत्र संख्यारहित | ऋषिमुनी तपती सप्त | आणि नारदमुनि असे जाणत | हेचि पुरी पुरातन ॥७॥
नामा म्हणे कैसे दिधले | हे ज्ञानासी सिध्द लाधले |हेचि आम्हासी जोडले |पूर्ण लाधले पीयूष ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग