वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २०, कूट अभंग ९७१ ते ९९०

मज स्वप्न लेवविला शृ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074618 · अभंग क्र. ९७९

979.
मज स्वप्न लेवविला शृंगारू ।
माझे उदरी जन्मला भ्रतारू ॥१॥
जागि सुति ना मी निदसुरी ।
चोळी सुदली तोडूनि गळसरी ॥२॥
लक्षण म्हणे की सुलक्षण म्हणे ।
येके उदरींच आम्ही दोघे जणे ॥३॥
सोइरीक पडिपाडे समसाटी ।
मी वो बैसले तयाचे पाठी ॥४॥
निपट कैसे आहेवपण ।
कैवल्या आधी तेल कांकण ॥५॥
निवृत्ति दास तेथे नाही ।
लग्नमुहूर्त बहुला ठायी ॥६॥

अर्थ :
माया म्हणते स्वप्नवत् असलेले जगरूपी अलंकार पुढीलप्रमाणे लेवविला. ब्रह्मस्वरूपांचे ठिकाणी शुद्धसत्त्वप्रधान मायेचा स्वीकार करून तिच्यात प्रतिबिंबीत झालेल्याला ईश्वर संज्ञा आली. नंतर ती माया त्याचे आधीन राहिल्यामुळे तो ईश्वर तिचा पती झाला. ती जागी नाही व झोपलेली नाही. म्हणजे तिला स्वस्वरूपाचे ज्ञान व अज्ञानही नाही. अशा अवस्थेमध्ये तिची गळसरी तोडली म्हणजे शुद्धसत्त्वप्रधानता काढून 'चोळी सुदली' म्हणजे आवरणात्मक शक्तीचा स्विकार करून, जगतरूपी अलंकार धारण केला. हे चांगले झाले का वाईट झाले । तात्त्विक आम्ही दोघे मायेश्वर एके उदरी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहोत. आम्ही दोघे पडिपाडे म्हणजे समसत्ताक असल्यामुळे या लग्नाच्या सोयरीकतेने आमची बरोबरी झाली. म्हणून मी त्यांचे पाठीवर बसले वास्तविक माझे अहेवपण नित्य असतांना लग्न सभारंभात केळवण होण्याच्या पूर्वीच मला सूक्ष्म जगतरूपी तेल लावून हातांत चबांगड्या भरल्या. 'बहुला ठायी, म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी ईश्वर मायेचे लग्न मुहुर्तावर लागले परंतु मी तेथ नाही म्हणजे लग्न भानगडीत नाही. कारण मूळचाच मी शुद्ध आहे. असे निवृत्तीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग