वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

सांगो नवरसलक्षण ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088978 · अभंग क्र. ९७८

978.
सांगो नवरसलक्षण ।
तरी शृंगार हास्य करुण ।
धीर वीर भयानक जाण ।
बीभत्स अदभुत शांतरस ॥१॥
शृंगारिक ते माधुर्य गाणे ।
हास्य ते विनोदकरणे ।
कारुण्‍य ते कीव भाकणे ।
धैर्य उपजवणे ते धीर ॥२॥
वीर ते युध्दाच्या गाठी ।
शब्दामागे शब्द उठी ।
भयानक रसा भय घाली पोटी ।
बीभत्स त्याहुनी कुष्टी उच्छुंखल ॥३॥
अदभुत रस ते नवलवाणे ।
जे का अचाटचि बोलणे ।
श्रोतयाते विस्मय देणे ।
ऐकता शहाणे निर्बुजती ॥४॥
शांतरस तो शुध्द सात्विक ।
विकारविवर्जित माजी विवके ।
निळा म्हणे हे नवरस देख ।
जाणति गायक चतुर ते ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग