वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

पुष्पक विमानातळी |हर

🙏 4. संत नामदेव · ABH-081729 · अभंग क्र. ९९१

991.
पुष्पक विमानातळी |हरि उतरले भूतळी | तंव उदयो पूर्वमेळी | सूर्याचा जाला ॥१॥
धन्य धन्य प्रश्नोत्तर |धन्य धन्य ते तरूवर |धन्य ज्ञानदेव अवतार | तिन्ही देव प्रगटले ॥२॥
संत सनकादिक देव | आणि भक्त आले सर्व | स्नाने करूनिया भाव | हरिचरणी ठेविला ॥३॥
विलाप मांडियेला भक्ती | खंति करिती त्रिजगती | ज्ञानदेवासारिखी मूर्ती | न देखो म्हणती देवराया ॥४॥
देव म्हणती निव्रुत्ति |तू प्रत्यक्ष शिवमूर्ति |तारावया क्षिती | अवतार धरियेला ॥५॥
सोपाने घातले लोटांगण | मुक्ताया धरिले चरण | संत करिताती स्तवन | पांडुरंगरायाचे ॥६॥
मग संबोखोनिया हरी | सोपानदेवा धरिला करी | निव्रुत्ति मस्तकावरी | करकमळ हरि ठेवितसे ॥७॥
नारा विठा पुढे चाले | ऐसे इंद्रायणीस आले | सौंदडीव्रुक्षातळी बैसले | सपरिवारे सकळै भक्त ॥८॥
न्याहाळिती कांसवद्रुष्टी | ऐसा हरि चालत स्रुष्टी | नामा होतसे हिंपुटी | ज्ञानदेवाकारणे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग