शिवरात्र व्रत करी यथ
984.
शिवरात्र व्रत करी यथाविधी । भावे पूजी आधी शिवलिंग ॥१॥
चुकलें चुकलें जन्माचें बंधन । पुनरागमन नये तेणे ॥२॥
एक बिल्वदळ चंदन अक्षता । पुजन तत्त्वता सोपे बहु ॥३॥
एका जनार्दनी पूजिता साचार । इच्छिले हरिहर पुर्ण करिती ॥४॥