ॐ नमोजी शिवा । नमो त
988.
ॐ नमोजी शिवा । नमो तुज महादेव करुनी उपकार जीवा । अवतार धरिला ॥१॥ सोपा मंत्र रामनाम । तेणे झाले सर्व काम । साधनांचा श्रम । गोवा उगविअला ॥२॥ बैसनियां दृढासनीं । नाम जपे निशिदीनीं । तयासी अवनी । सोपी दिसे ॥३॥ बरवे साधन उत्तम । अवघा निवारिला श्रम । गाता तुमचे नाम । वंद्य तिहे लोकी ॥४॥ जड जीव उद्धरिले । कलिमाजीं सोपे केले । रामराम जप वहिले । थोर साधन हे ॥५॥ अवतार धरुनी साचा । उद्धार केला जड जीवांचा । एका जनार्दनी नामाचा । वाढविला महिमा ॥६॥
