वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

मग सकळ प्रेम पुतळे |

🙏 4. संत नामदेव · ABH-081716 · अभंग क्र. ९८२

982.
मग सकळ प्रेम पुतळे | बैसले माजी ब्रह्ममेळे | तेथे नामा वचन बोले | स्वामीप्रति ॥१॥
वोळले चैतन्य सतरावे | पूर्ण वोघ नामा विठ्ठलदेवे | पव्हे घालुनी ज्ञानदेवे | जग तारिले कीर्तने ॥२॥
नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ | परि आमुचे मन निमग्न | चरणरजे पापभग्न | पवित्र जालो ॥३॥
तरी स्वामिराजा विनंति | परियेसी गा माझी पुढती | हे आळंकापुरी होती | कवणिये युगी ॥४॥
हे सांगिजे जी समर्था | कवण क्षेत्र कवण तीर्था | येथे क्षेत्रज्ञ हा सर्वथा | कवण धर्म असे ॥५॥
तू आत्माराम संपन्न | जुगा जुनाट नारायण | तुजप्रति हे वचन | न साहे माझे ॥६॥
कासवीचा तुषार गाढा | तैसा तुझा पवाडा | हे पुसणे कवणिया चाडा | ते तूंचि जाणसि ॥७॥
नामा उभा तिष्ठत प्रेमे | संत दाटले सप्रेमे | आपण ते ते अनुक्रमे | सांगतसे देव ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग