वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

मग म्हणे सर्वज्ञ विठ

🙏 4. संत नामदेव · ABH-081728 · अभंग क्र. ९८५

985.
मग म्हणे सर्वज्ञ विठ्ठल | न लावावा वाढवेळ |मग पातले निर्मळ | सिध्देश्वरलिंगी ॥१॥
धन्य धन्य हरिदिवस | धन्य धन्य हा निवास |आपण ह्रषिकेश | भक्ता साह्य ॥२॥
वैष्णव मिळाले संपन्न | गाती हरिनाम कीर्तन |तंव पातले सोपान | प्रेमे वोसंडत ॥३॥
चरणी घातली मिठी | विठोजी म्हणे उठी उठी |लवलाहे उघडी द्रुष्टी | भेटे ज्ञानदेवा ॥४॥
येरू म्हणे मी क्रुतक्रुत्य | नामस्मरण तुझे नित्य |तेणे सकळ हित | आमुचे जाले ॥५॥
तूंचि का जनकजननी | तूंचि एक त्रिभुवनी |पाहता नित्य उन्मनी | लागे आम्हा ॥६॥
समाधि शेज ज्ञानेसी | घातली अहर्निशी |ते कर्णी परिसत जिवेंसी | तुवा चरण धरित आलो ॥७॥
नामा म्हणे ज्ञान सोपान | एक जाले जनी जनार्दन |समाधिसंगे संजीवन | आळंकापुरी आले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग