वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

वेदध्वनि केलिया मुनी

🙏 4. संत नामदेव · ABH-081720 · अभंग क्र. ९८८

988.
वेदध्वनि केलिया मुनी | गंधर्वगायने होती गगनी | ब्रह्मादिक इंद्र विमानी | इंद्रायणी ज्ञानदेवी ॥१॥
लागलिया मंगळतुरे ध्वनि | तीर्थे उभी असती कर जोडुनी |विठ्ठलदेव ज्ञान संजीवनी |नयनी न्याहाळिती ॥२॥
राही रखुमाई माता | सत्यभामा गोपी समस्ता | आरतिया ओवाळिती निभ्रांता | ब्रह्म त्वरिता ज्ञानदेवा ॥३॥
देवॠषिगण सकळ | जयजयकार ध्वनि मंजुळ | स्तुतिस्तोत्रे सकळ | नक्षत्रादिक गाती ॥४॥
वरूषति दिव्यसुमने | निव्रुत्तिसोपान नारायणे | संमोखिले संजीवने | नित्य पारणे हरिपाठे ॥५॥
परिसा भागवत डुलत | विठ्ठली झाला क्रुतक्रुत्य | नामा असे शोकाकुलित |चरणी रत विठ्ठलाचे ॥६॥
शेज घालुनी सुमनी | विठ्ठल पाहे रुक्मिणी | ज्ञानदेवाचे गुण मनी | आठवती म्हणे हरी ॥७॥
नामा जाला भयभीत चित्ते | ज्ञानासारखे रत्न मागुते | न देखो ऐसे विठ्ठलाते | पुसे त्वरित रुक्मिणी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग