देवो म्हणती रुक्मिणी
989.
देवो म्हणती रुक्मिणी | हा येचि युगी देखिला नयनी | हेंचि ज्ञानसंजीवनी | जाण त्रैलोक्यासी ॥१॥
धन्य धन्य धरातळी | जो याते दृष्टी न्याहाळी | तो वात येईल टाळी | वैकुंठ भुवनासी ॥२॥
जो करील याची यात्रा | तो तारील सकळ गोत्रा | सकळही कुळ पवित्रा |याचेंनि दरुषणे होती ॥३॥
आळंकापुरी हे शिवपीठ | पूर्वी येथे होते नीळकंठ | ब्रह्मादिकी तप वरिष्ठ |येथेंचि पै केले ॥४॥
इंद्र येऊनिया भूमीसी | याग संपादिले अहर्निशी | इ़ंद्रायणी इंदोरिसी |या पासोनि पंचक्रोशी ॥५॥
तेथे त्रिवेणी गुप्त वसे | भैरवापासूनि भागीरथी बसे | पूर्ववटि माया दिसे |ते प्रत्यक्ष जाण पार्वती ॥६॥
भोवते वनवल्लिव्रुक्ष | येथे देव येऊनि होताती पक्ष | हे असे नित्य साक्ष | अस्थी नासती उदकी ॥७॥
पंढरीहुनी हे सोपे |जनाची हरावया पापे |कळिकाळ कोपलिया कोपे | त्यांचे न चले आळंकापुरीसी ॥८॥
ऐसे सांगता हरिसी | प्रेम ओसंडले रूक्मिणीसी | म्हणे धन्य धन्य जयाचे कुसी | ज्ञानदेव जन्मले ॥९॥
नामा म्हणे माझा स्वामी | स्वये संतसमागमी | ऐसे सांगितले ग्रामी |आळंकापुरीसी ॥१०॥
