वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

स्नानविधी केलिया भक्

🙏 4. संत नामदेव · ABH-081696 · अभंग क्र. ९८१

981.
स्नानविधी केलिया भक्ती | नाममंत्राचिया आव्रुति |मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ति | विठोबाची ॥१॥
धन्य धन्य तो देव ज्ञान | राजा निव्रुत्ति निधान |विठोजी आपण | भक्ता साह्ये ॥२॥
मग सकळहि भक्तमेळी | सहित वनमाळी |बैसले तये पाळी | इंद्रायणीचे ॥३॥
एकी केले स्तुतिस्तोत्रे | एक जपताती नाममंत्रे |एक गाताती वेदस्तोत्रे | विठोबासी ॥४॥
तव पुढारा झाला नारा | तो नामयाचा पुत्र सैरा | तो पुसतसे विचारा | नामयासी ॥५॥
ये संतसभेमाजी | राऊळ बैसले असे सहजी | याते पुसि जो का जी | कवण क्षेत्र म्हणोनी ॥६॥
उठिला नामा प्रेमे डुले | वंदिली विठ्ठल पाऊले | मग करद्वये जोडुनि बोले | साशंकित ॥७॥
नामा म्हणे पूर्णब्रह्म | ते कैसे सभासदी मन | ते बोलतसे परम | ज्ञानदेवा भाग्ये ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग