वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

विठोजी म्हणे ज्ञानदे

🙏 4. संत नामदेव · ABH-081727 · अभंग क्र. ९७८

978.
विठोजी म्हणे ज्ञानदेवा | तुझी विश्रांती मन ठेवा |ते मुराली आमुचिया भावा| निःसंदेहे ॥१॥
कैसे समाधान ज्ञानदेवा | आळंकापुरी समाधि ठेवा |विठ्ठल ओळला वोल्हावा | नित्यरुपसमाधि ॥२॥
ध्रु.॥संत करिती महा खेद | म्हणती ज्ञानांजन उद्बोध |मग चालिले विद्गद | आळंकापुरीसी ॥३॥
महावल्ली व्रुक्ष अजान | तो निक्षेपिला पूर्णधन |मग विठोजी म्हणे आपण | ज्ञानदेवासी ॥४॥
धन्य धन्य ज्ञानेश्वरा |पुण्यभूमि समाधि स्थिरा |क्रुष्ण-पक्षी तुज निर्धारा | भेट देत जाईन ॥५॥
कार्तिक मास शुध्द एकादशी |पंढरीयात्रा होईल सरिशी |दुसरी क्रुष्णपक्षी निर्धारेंसी | तुज दिधली असे ॥६॥
हे ऐकोनि संत जनी | जयजयकार केला ध्वनी |दिंड्या पताका मेळ गगनी | देव सुमने वर्षताती ॥७॥
नामा म्हणे आले वैष्णव | आळंकापुरी मिळाले सर्व |समाधि सुखी ज्ञानदेव | बैसते जाहले ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग