वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

श्रीज्ञानेश्वरसमाधीम

🙏 4. संत नामदेव · ABH-081708 · अभंग क्र. ९७६

976.
श्रीज्ञानेश्वरसमाधीमहिमा

ज्ञानदेवो म्हणे विठ्ठलासी | समाधान तूंचि होसी |परि समाधी हे तुजपासी | घेईन देवा ॥१॥
नलगे मज मुक्ति | नलगे मज मुक्ति |तुझा चरणी आर्ती | थोर आथी ॥२॥
विठोजी म्हणे ज्ञानदेवा | ज्ञानसागरा अनुभवा |वचनेंचि विसावा | जाला मज ॥३॥
ऐके ज्ञानचक्रवर्ती | तू तव ज्ञानाचीच मूर्ती | परि पुससी जे आर्ती | ते कळली मज ॥४॥
येक येक अनुभव क्रुपा | पद पदांतरे केला सोपा |परि यांत माझिया क्रुपा | सकळही वोळली ॥५॥
ज्ञानदेवे चरणी मिठी | मनेसी पडली एके गांठी |द्रुश्याद्रुश्य जाली एक द्रुष्टी | प्रत्यक्ष भेटविलेंसी ॥६॥
कर ठेऊनी कुरवाळी | सर्वांग न्याहार न्याहळी |म्हणे तुवा घेतली जे आळी | ते सिद्धिते पावेल ॥७॥
नामा उभा असे सन्मुख | ऐकता थोर खेद दुःख |म्हणे ज्ञानांजन महासुख | समाधि घेतसे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग