वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २०, कूट अभंग ९७१ ते ९९०

पैल मेरूच्या शिखरी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074622 · अभंग क्र. ९८०

980.
पैल मेरूच्या शिखरी ।
एक योगी निराकारी ।
मुद्रा लावुनी खेंचरी ।
प्राणायामी बैसला ॥१॥
तेणे सांडियेली माया ।
त्यजियेली कंथा काया ।
मन गेले विलया ।
ब्रह्मानंदा माझारी ॥२॥
अनुहत ध्वनि नाद ।
तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्याविनोदे ।
छंदे छंदे डोलतुसे ॥३॥
ज्ञान गोदावरीच्या तीरी ।
स्नान केले पंचाळेश्वरी ।
ज्ञानदेवाच्या अंतरी ।
दत्तात्रेय योगिया ॥४॥

अर्थ :
माऊली या अभंगातून दत्तात्रेयाचे वर्णन करीत आहेत. 'पैलमेरूच्या शिखरी, म्हणजे जागृतादिअवस्थेच्या पलीकडे असणारी जी तुर्याअवस्था त्या अवस्थेत कोणी एक अधिकार संपन्न योगीपुरूष परमात्मप्राप्ती करिता खेचरी मुद्रा लावून श्रेष्ठ पदावर प्राणायाम करीत बसला आहे. त्याने मायेचा परित्याग तर केलाच आणखी कंथा व ती घालण्याचे शरीर या दोन्हींचा अभिमान सोडला कारण परमानंदामध्ये मन लीन होऊन गेले. अजपा जपाच्या अनुहत ध्वनीचा नाद ही परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झाला. उन्मनी जी तुर्या तिच्या आनंदात डुलत आहे. ज्ञानगंगेत ज्याने पांचाळेश्वरांत स्नान केले आहे. असा दत्तात्रय योगीराज माझ्या अंतरांत आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग