वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

हस्तक ठेविला माथया |

🙏 4. संत नामदेव · ABH-081713 · अभंग क्र. ९८७

987.
हस्तक ठेविला माथया | ज्ञानदेव लागे पाया | विठोजी म्हणे लवलाह्या | समाधीस बैसावे ॥१॥
इंद चंद्र देव येती |ब्रह्मादिक गीती गाती |यमवरुणब्रुहस्पति | विमाने दाटती अंतरिक्षी ॥२॥
तंव पातले गरूड देव | रुक्मिणी सत्यभामा भाव |राही माता गोपी सर्व | समाधि ज्ञानदेव पहावया ॥३॥
ब्रह्माइंद्रप्रजापति | सर्व अंतरिक्षी पाहती |आळंकापुरी ये श्रीपती | हरुष चित्ती ज्ञानदेवा ॥४॥
रुषिमुनी गणगंधर्व | पिशाच गुह्यक सर्व |ध्रुव अंबॠषि माधव | चित्ती भाव पहावया ॥५॥
ऐसी दाटली विमाने | संती जाणितले ज्ञानें|ज्ञानदेव ब्रह्म होणे | हे विंदान विठ्ठलाचे ॥६॥
जयजय शब्दे ध्वनि गर्जे | तेणे स्वर्गम्रुत्युपाताळ गाजे |पाताळी शेष म्हणे भुंजे | प्रेमे फुंजे न समाये ॥७॥
नामा म्हणे शिवादिक | सिध्देश्वरी मिळाले सकळिक |पाहाती विठ्ठलकौतुक | ज्ञानदेव समाधीचे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग