देव म्हणे नामया | ऐक
984.
देव म्हणे नामया | ऐके येथे चित्त देउनिया | एक एक तीर्थ सांगावया | हे तो पुराणी असे॥१॥
ध्रु.॥नकळे देवाची थोरी | कैसे पुढारिले मुरारी | गौप्यगुज श्रीहरी | सांगतसे नामया | पुराण म्हणसी कोण कथा | तरी ऐके गा तू सकळार्था | शैवशास्र हा ग्रंथ सर्वथा | सिद्धमार्ग असे ॥३॥
जे जे जुनाट क्षेत्रतीर्थ | जे जे ब्रह्मनामे परमार्थ |तो तो सांगितला हेत |चतुरानने ॥४॥
ऐसे देवमुखीचे वचन | ऐकता संतोषले पूर्ण |मग देताति आलिंगन | येकमेकांसी ॥५॥
जयजयकाराचा ध्वनी | विठ्ठलनामे गर्जे वाणी |प्रेम ओसंडत नयनी |स्फुंदन रोमांचित दाटले ॥६॥
स्फु दत नामा नाचे गाये | परिसा म्हणे वोळली माये |तो ज्ञानासी पान्हा होये | पूर्ण बोधाचा ॥७॥
नामा म्हणे सकळ संतमेळी | कथा सांगितली रसाळी |तंव ज्ञानदेवा करतलामळी | समाधि शेज घातली ॥८॥
