वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

महा ऊत्साव त्रयोदशी

🙏 4. संत नामदेव · ABH-081693 · अभंग क्र. ९७९

979.
महा ऊत्साव त्रयोदशी | केला त्या ज्ञानदेवासी |मग नामा म्हणे विठोबासी | चरण धरूनिया ॥१॥
समाधिसुख दिधले देवा | ज्ञानांजन आळंकापुरी ठेवा |आजानव्रुक्षी बीज वोल्हावा | या ज्ञानांजनासी ॥२॥
क्रुपा आली विठ्ठलासी | म्हणे ज्ञानदेवा परियेसी |तीर्थ भागीरथी अहर्निशी | तुज नित्य स्नानासि दिधलीसे ॥३॥
इंद्रायणी दक्षिणवाहिनी | भागीरथी मणिकर्णिका दोन्ही |इया मिळालिया त्रिसंगमी | पुण्यभूमि तुझिये ॥४॥
येथे जरी नित्य स्नान घडे | तरी नित्य वैकुंठवास जोडे |तुज नाही नाही रे कुवाडे | मी वाडे कोडे उभा असे ॥५॥
येथे हरिकथा नाम वाचे | जो उच्चारिल विठ्ठलाचे |तयासी पेणे वैकुंठीचे | दिधले साचे तिअक्षरी ॥६॥
आणिक ऐके रे ज्ञानराजा | जो या सिध्देश्वरी करील पूजा |तो अंतरंग सखा माझा | मुक्ति सहजा जाली त्यासी ॥७॥
नामा म्हणे ऐसे अंतरंग | कैसा वोळला पांडुरंग |ज्ञानदेवी समाधि सांग | हरिपाठ कीर्तने ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग