वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ज्ञानदेव उभा जोडोनि

🙏 4. संत नामदेव · ABH-081697 · अभंग क्र. ९७७

977.
ज्ञानदेव उभा जोडोनि हस्त | भक्त पाहती समस्त |विठोजी म्हणे सकळा स्वार्थ | या ज्ञानांजनाचा ॥१॥
कैसे वोळले त्वा ज्ञाना | समाधान तया ध्याना |मन नाठवे मीतूपणा | समाधि खुणा ज्ञानासी ॥२॥
मग म्हणे विठोजी दातार | समाधि तुज निरंतर |आता प्रस्थान करी साचार | मज निरंतर आठवी ॥३॥
कैसे परिपूर्ण वोळले | आपण समाधिरुप जाले |मनाते मन समरसले | विठ्ठलरुपी ॥४॥
दशमी प्रस्थानाचा समयो | येकादशी जागर उत्सावो |द्वादशी क्षीरापती महोत्सवो | ज्ञानदेवे केला ॥५॥
त्रयोदशी म्हणे पांडुरंग | कांही न करी गा उद्वेग |आळंकापुरी समाधि प्रसंग | करी करी लवलाह्या ॥६॥
माता रूक्मिणी वाढी ताटी | विठोजी म्हणे उघडी द्रुष्टी |तुज मज आहे नित्य भेटी | येई पंढरीये ॥७॥
नामा म्हणे ज्ञानउदयो | आळंकापुरी सिध्द समयो |परी विठ्ठली मुराला भावो | या ज्ञानदेवाचा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग