हरिहर ऐक्य - अभंग ९८
989.
हरिहर ऐक्य - अभंग ९८९ ते १००७
एका आरोहणा नंदी । एका गरुड वाहे स्कंधीं ॥१॥ एका नित्य वास स्मशानी । एका क्षीरनिधी शयनी ॥२॥ एका भस्मलेपन सर्वांग । एका चंदन उटी अव्यंग ॥३॥ एका रुंडमाळा कंठी शोभती । एका रुळे वैजयंती ॥४॥ एका जनार्दनी सारखे । पाहता आन न दिसे पारखें ॥५॥
