एकंदर देवे आज्ञा केल
331.
एकंदर देवे आज्ञा केली ।
पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥
जे जे तुझिया क्षेत्रासी येती ।
त्या त्या उत्तम गति पाठवी ॥२॥
उत्तम अधम न म्हणे काही ।
रिगमचि नाही दोषा येथे ॥३॥
निळा म्हणे हे पंचकोशी ।
जाणा वाराणसीसमान ॥४॥
331.
एकंदर देवे आज्ञा केली ।
पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥
जे जे तुझिया क्षेत्रासी येती ।
त्या त्या उत्तम गति पाठवी ॥२॥
उत्तम अधम न म्हणे काही ।
रिगमचि नाही दोषा येथे ॥३॥
निळा म्हणे हे पंचकोशी ।
जाणा वाराणसीसमान ॥४॥