वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १०, देवापाशी मागणे अभंग ३३० ते ३४१

आल्हादपण काय सांगसी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074880 · अभंग क्र. ३३१

331.
आल्हादपण काय सांगसी देवा ।
मन बैसे भावा तैसे करी ॥
हा घोडा हा राऊत करुनिया दावा ।
मग पदी बैसवा ब्रह्माचिये ॥
मी डोलेन आनंदे तुमचेनि प्रसादे ।
रत्न जेवी अंधे देखियेले ॥
करा तत्त्वी सौरसु म्हणे निवृत्तीदासु ।
जेथे रात्री दिवसु आथिचिना ॥

अर्थ :
नसत्या ब्रह्मानंदाच्या गोष्टी देवाला काय सांगतोस अनन्यभावाने मन ठिकाणी वसेल असे कर. नुसत्या शौर्याच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा वा आणि त्याच्यावर बसणारा हा घोडा व बसणारा स्वार असे करुन दाखव. म्हणजे मी मायेला जिंकले आहे असे नुसते तोंडाने बोलू नको तर ही माया मिथ्या आहे आणि तिचे अधिष्ठान सत्य आहे असे समजून घे. आणि मग मनाला ब्रह्मपदी बसव. अशी स्थिती झालेली मी तुमच्या प्रसादाने पाहिली. म्हणजे आनंदाने डोलेन. ही स्थिती मला लाभली म्हणजे आंधळ्याने रत्न पाहिलेवअसे होईल. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही धर्म नाहीत अशा ज्ञानस्वरुप परमात्म्याच्या ठिकाणी माझे प्रेम वसेल असे कर. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग