जावोनी राउळा जोडूनिय
332.
जावोनी राउळा जोडूनिया हात । बोले ज्ञानेश्वर विठोबासी ॥1॥
करावी ही तीर्थे आवड अंतरी । घ्यावे बरोबरी नामदेवा ॥2॥
ऐकताचि ऐसे म्हणे पांडुरंग । न धाडिता राग येईल तुज ॥3॥
तयाविण मज घडी जरी जाय । युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ॥4॥
जनी म्हणे मग नामया पाचारी । कृपाळुवा हरि मायबाप ॥5॥
