मना तू व्यापकापरीस व
328.
मना तू व्यापकापरीस व्यापक ।
ब्रह्मांड हे देख व्यापियेले ॥१॥
तेथे निजसुख कैचे जीवालागी ।
म्हणोनी तुजलागी विनवितसे ॥२॥
जेथवरी मना तुझा फिरे वारा ।
तेथेवरी थारा सुखा नाही ॥३॥
जेथवरी मना तुझा रे पसर ।
सुखाचा विचार तेथे नाही ॥४॥
तुझी कृपा होये तरीस सुख लाहे ।
म्हणोनिया पाय धरितसे ॥५॥
बहेणि म्हणे तुवा ठकिले बहुवस ।
तेणे कासावीस जीव माझा ॥६॥
