म्हणती माथा असते तों
327.
म्हणती माथा असते तोंड । अन्ने भक्षितो उदंड ॥1॥
कैची पोटे आमुची लहान । गोड धर्माघरचे अन्न ॥2॥
उदरे सागराच्या ऐसी । करुनी यावे धर्मापाशी ॥3॥
तृप्ति द्रौपदीच्या हाते । नित्य भक्षाया अन्नाते ॥4॥
वदन करवेना तळी । वरुती चंद्राची मंडळी ॥5॥
चंद्री लागलीसे नेत्रा । कोण सांभाळिते धोत्रा ॥6॥
तरी आवडी भोजनी । म्हणे नामयाची जनी ॥7॥
