ज्ञानियांचे ज्ञेय ध्
323.
ज्ञानियांचे ज्ञेय ध्यानियांचे ध्येय | पुंडलिकाचे प्रिय सुख वस्तु ॥१॥
ते हे समचरण उभे विटेवरी | पहा भीमातीरी विठ्ठल रुप ॥२॥
जे तपस्वियांचे तप जे जपकांचे जाप्य | योगियांचे गौप्य परमधाम ॥३॥
जे तेजकांचे तेज जे गुरूमंत्राचे गुज | जे पूजकांचे पूज्य कुळदैवत ॥४॥
जे जीवनाते जीवविते पवनाते निवविते | जे भक्तांचे उगविते मायाजाळ ॥५॥
नामा म्हणे ते सुखचि आयते | जोडले पुंडलिकाते भाग्य योगे ॥६॥
