वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 17. थालीपाक

वंदोनी श्रीकृष्‍ण चर

🙏 16. संत जनाबाई · ABH-073886 · अभंग क्र. ३२३

323.
वंदोनी श्रीकृष्‍ण चरण । हरुषे घाली लोटांगण ॥1॥
म्हणे तूचि माझ्या मना । स्वस्थ करी गा नारायणा ॥2॥
आश्रमासी येता ऋषी । तोवरी आयुष्य प्राणासी ॥3॥
ऐकताचि हांसे देव । नदिसे प्राप्तीचा उपाव ॥4॥
अवकाळी कैचे अन्न । विचारिता दिसे विघ्न ॥5॥
त्यांचे असो बळ तैसे । काही वोपावे आम्हास ॥6॥
स्वस्थ नव्हे माझे मन । क्षुधा लागली दारुण ॥7॥
ताटी विस्तारिला मेवा । तुझा ऐकोनिया धावा ॥8॥
न जेविता आलो येथे । बहु झालो क्षुधाक्रांत ॥9॥
सत्वर मेळवी भोजनी । म्हणे नामयाची जनी ॥10॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग