वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

अलाडु आडु पालाडु आडु

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074748 · अभंग क्र. ३२४

324.
अलाडु आडु पालाडु आडु मध्ये वाहे पाणी ।
तिही संधी खेळु मांडिला सीतादेवी राणी ॥
सुखाती चांदणे राती ।
बहुते खेळती येकु देखो ॥
खेळता खेळता नवल पाहे ।
देखणा खिर खाये ।
सांपडे ते कोण्हा न संगे भोग्या शिवोन राहे ॥
भोगिया शिवोन उतरला डायी ।
ज्ञानदेव सांगे निवृत्तीच्या पायी ॥

अर्थ :
अलिकडची कड व पलीकडची कड या दोन्हीच्या मध्ये नदीच्या पाण्याचा ओघ असतो. त्या ओघांत रात्री खेळ मांडला. सीतादेवी प्रमाणे स्वच्छ जी चांदणी रात्र तिच्यामध्ये अतिशय आनंद असून ब्रह्मदृष्टीने सर्व गोपाळ खेळ खेळत आहेत. त्यामध्ये असा चमत्कार आहे की तो खेळ खेळत असता त्यातील आनंद ज्ञानवान भक्तच भोगतो. त्या आनंदाचा लाभ कोणालाही वर्णन करता येत नाही. आपण भोक्ते व तो आनंद भोग्य आहे. अशा द्वैत भावाला भिऊन तो ज्ञानवान गडी त्या डावातून पार पडला. श्रीगुरू निवृत्तिरायांच्या कृपेने ह्या आनंदाचा मी अनुवाद केला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग