वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ९, करुणा > अभंग ३२६ ते ३२९

पडले दूरदेशी मज आठवे

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075020 · अभंग क्र. ३२९

329.
पडले दूरदेशी मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासी ॥
दिनु तैसी रजनी मज जालिये वो माये ।
अवस्था लावुनी गेला अजुनी का न ये ॥
गरुडवाहना गंभिरा येई गा दातारा ।
बापरखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥

अर्थ :
अज्ञानामुळे दूर देशांत येऊन पडले त्यामुळे रात्रंदिवस मला तुझी आठवण येते. हा तुझा वियोग मला अगदी असाह्य झाला आहे. त्यामुळे माझ्या जीवाला फार कष्ट होत आहेत. पण तुझी भेट अजून का होत नाही. हे कळत नाही. हे गंभिरा गरुडवाहना दयानिधी श्रीकृष्णा हे रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला तुम्ही लवकर धावत येऊन मला भेट द्या. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग