तुम्ही सकळिक संत आहा
334.
तुम्ही सकळिक संत आहात सज्ञान । हे माझे अज्ञान फार आहे ॥1॥
याजबरोबर चालावी हो वाट । मोडतील काटे सांभाळावे ॥2॥
हळूहळू जावे करु नका घाई । चालायाची नाही सवय त्यासी ॥3॥
लागताचि भूक न धरी हा निर्धार । घ्यावा समाचार क्षणक्षणा ॥4॥
जनी म्हणे ऐसे बोलिला घननीळ । नेत्रींहुनी जळ वाहतसे ॥5॥
