वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

मना तूचि माझे संचित

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075863 · अभंग क्र. ३२५

325.
मना तूचि माझे संचित क्रियमाण ।
भ्गो हे भोगणे सुखदुःख ॥१॥
तुझेनीच मज बंध मोक्ष जाण ।
येर्‍हवी पुसे कोण मजलागी ॥२॥
मी हे माझे द्वैत वाढविला विकल्प ।
पुण्य आणि पाप तुझे देठी ॥३॥
निश्चलता तुज जरी हे असती ।
सुखदुःखाची प्राप्ति कोणालागी ॥४॥
जीवशिव नामे वाढली उपाधी ।
तुझेनीच बुद्धि मना जाण ॥५॥
बहेणि म्हणे मना भाकितसे करूणा ।
सोडवी मज दीना काळाहांती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग