त्वंपद तत्पद असिपद य
328.
त्वंपद तत्पद असिपद यांवेगळा दिसे । खोल बुंथी घेऊनी विटेवरी उभा असे गे माय ॥१॥
वेडावला पुंडलिके उभा केला । तेथोनी कोठे न जाय गे माय ॥२॥
भक्ता अभयकर देतुसे अवलीळ । मेळवोनी मेळा वैष्णवांचा गे माय ॥३॥
पुंडलिकें मोहिला उभ उघाडचि केला । एका जनार्दनी ठसावला रुपेंविण गे माय ॥४॥
