वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 17. थालीपाक

म्हणे पाचारा भूदेवा

🙏 16. संत जनाबाई · ABH-073878 · अभंग क्र. ३२९

329.
म्हणे पाचारा भूदेवा । धर्म म्हणे जावे भीमा ॥1॥
गंगातिरासी येऊन । नमियेल ऋषिजन ॥2॥
त्वरा करा ऋषिजन । पात्री विस्तारले अन्न ॥3॥
म्हणती बापा ऐसे नव्हे । पोट आहे किंवा काय ॥4॥
आता स्वस्थ प्रसादे । तृप्त झाली ऋषिवृंदे ॥5॥
कैचा नष्‍ट दुर्योधन । आम्हा धाडिले दुर्जने ॥6॥
कष्‍टी करिता अंबऋषी । चक्र लागले पाठीसी ॥7॥
तेचि गोष्‍टी झाली आता । शीघ्र पळावे तत्त्वता ॥8॥
माझा आशिर्वाद धर्मा । नित्य कल्याणची तुम्हा ॥9॥
ऋषि निघाले तेथुनी । म्हणे नामयाची जनी ॥10॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग