आता पाहेन वाडेंकांडे
327.
आता पाहेन वाडेंकांडे ।
याचे रुपढे दृष्टीभरी ॥१॥
आहे उभा ईटेवरी ।
न वजे पंढरी सांडूनिया ॥२॥
येती त्यासी आलिंगन ।
पाववी देऊन संतोषा ॥३॥
निळा म्हणे दासांप्रती ।
वाटितो मुक्ति दर्शने ॥४॥
327.
आता पाहेन वाडेंकांडे ।
याचे रुपढे दृष्टीभरी ॥१॥
आहे उभा ईटेवरी ।
न वजे पंढरी सांडूनिया ॥२॥
येती त्यासी आलिंगन ।
पाववी देऊन संतोषा ॥३॥
निळा म्हणे दासांप्रती ।
वाटितो मुक्ति दर्शने ॥४॥